वरच्या चित्रात खालचा वंचक (स्प्रिंग) हुडकायचा प्रयत्न करा. लगेचच दिसेल.
दिगम्भा, तुमच्यासारख्या रसिक माणसाला नक्कीच सर्व सर्डस दिसू शकतील.
मात्र, त्याकरता डोळे विस्फारायची गरज नसते, आकुंचित करायची गरज नसते, वेडे वाकडे फिरवायची गरज नसते.
ते निसर्गदृष्य पाहतांना वस्तूंच्या खोलीचा अंदाज घेतांना फिरतात तसे सहज चित्रावरून फिरवावेत.
चित्र दृष्टीला लंब आणि ताठ एकाच प्रतलावर असावे.
त्रिमिती चित्र प्रत्यक्षातील चित्राखाली काही अंतरावर साकारलेले असते.
आता पुन्हा प्रयत्न करा, आणि सांगा.