नमूने केलेला नाच 'सर्वांना' आवडला यामध्ये 'सर्व' या संचात अभिप्रेत असलेले घटक कोण यावर नमूचा नाच कसा झाला हे अवलंबून आहे.
चमूला पहिले बक्षीस मिळाले असते आणि नमूला दुसरे आणि तरीही चमूने 'नमूने फालतू नाच केला व पक्षपाताने तिला बक्षीस मिळाले' असे म्हटले असते तर ते अधिक विश्वासार्ह झाले असते का?
घरी रमाकाकू आणि ठमाकाकू दोघी बाहेरच उभ्या होत्या यामध्ये रमाकाकू आणि ठमाकाकू यांमधील मैत्रीपूर्ण किंवा जवळचे/घरोब्याचे/शेजारधर्माचे संबंध अपेक्षित असावेत हे गृहित धरले तर ठमाकाकूंना नमूच्या नाचाचा एकंदर दर्जा माहिती असणे हे देखील पटण्यासारखे आहे. त्यामुळे ठमाकाकूंनी केलेली मल्लीनाथी सर्वस्वी अस्थानी नाही. आता रमाकाकू आणि नमू यांची प्रतिक्रिया पाहिली तर ठमाकाकूंनी 'ज्याचं करावं भलं...' असा निःश्वास सोडल्यास आश्चर्य वाटणार नाही.