मला जे म्हणायचे आहे त्यापैकी बरेचसे प्रदीप यांनी वर लिहिले आहेच. त्यात थोडी भर. 

इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.

संपूर्ण असहमत. २६ जुलैच्या वेळचे अनेकांचे अनुभव ऐकले आणि वाचले आहेत. मनोगतावर प्रियाली यांचाही अनुभवकथन  करणारा लेख आहे. वाचला नसल्यास जरूर वाचावा. अनेक ठिकाणी अस्तंगत होऊ घातलेली माणुसकी मुंबईत कशी दिसली/दिसते हे कळेल.

एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात,

कुणा मुंबईकराला असे वाटत असेल पण हे मुंबईकरांचे सरसकट वर्णन नक्कीच नाही. मुख्य प्रश्न मुंबईकर आणि 'इतर शहरकर' यांच्या मानसिकतेमध्ये आहे. मी मुंबईत १५ वर्षे काढली आहेत आणि मुंबईबाहेर २० वर्षे. अजूनही मधूनमधून मुंबईला जाणे होते. तेव्हा माझा अनुभव व निरीक्षण यातून मी सांगते की एखादी नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आली तर मुंबईकरांचे वागणे आणि 'इतर शहरकरांचे' वागणे ह्यात खूप फरक असतो.

माझ्या प्रतिसादात मी 'टेलिग्राफ'मध्ये आलेल्या  'हॅट्स ऑफ' चा उल्लेख केला आहे. टेलिग्राफ हे बहुतांशी 'प्रो बेंगॉली' पत्र आहे. त्यात असे स्फुट येणे हेच खूप बोलके आहे.

राहता राहिला मुद्दा पोटाच्या भुकेचा. तर जे मध्यमवर्गीय लोक दुसऱ्या/तिसऱ्या दिवशी कामावर  गेले त्यांचे काही हातावरचे पोट नव्हते!  ते गेले कारण त्यांची मानसिकता तशी आहे.

हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहऱ्याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहऱ्याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते.

आपल्याला भाबडेपणा वाटत असेल तर वाटू दे पण इतर शहरातही सजीवच राहत असतात पण ते मुंबईकरांप्रमाणे वागत नाहीत म्हणून माझा मुंबईला पुन्हा एकदा सलाम!