गोळेजी,

या दुसऱ्या चित्रातली स्प्रिंग नीट दिसते.
म्हणून मी पहिले (मूळ लेखातले) चित्र पुन्हा पहायला घेतले. तेव्हा त्यात वेगवेगळ्या पातळ्या (प्रतले/प्लेन्स) दिसू लागली पण तुम्ही म्हणता तो हंसोंका जोडा काही दिसला नाही.
मला अजून वाटते की यात "समांतर" व "चकणा" असा भेद असण्याची शक्यता आहे. मला स्वतःला "समांतर" दिसतात व "चकणे" पाहता येत नाहीत हे वर म्हटलेलेच आहे.

आतापर्यंत असली चित्रे "पाहण्या"चे तंत्र मला अवगत झालेले आहे त्यामुळे त्या गोष्टीचा खुलासा माझ्यासाठी आवश्यक नाही.

अशी चित्रे जेव्हा आपण पाहू शकतो तेव्हा ती किती विलोभनीय व सुंदर दिसतात ते समजावून सांगणे मात्र कठीण आहे, डोळस आणि आंधळा यांच्यातील संवादासारखे.

- दिगम्भा