प्रतिसादी मनोगतींचे मनापासून आभार.

वेदश्री, मन्जुशा, केशवसुमार, रामची आई, तुम्ही दिलेल्या पद्धतीनुसार भेळ करून पाहीन.

प्रीती तुम्हीपण माझ्यासारख्याच भेळप्रेमी दिसता! मी पण पुण्यातल्या सर्व भेळी खाल्या आहेत. पुष्करिणी भेळ कोल्हापुरी चुरमुरे (पांढरे शुभ्र व टपोरे) वापरतात. त्यासमोरची बहुतेक नवसह्याद्री भेळ पण छान आहे. तिथे आपण  पाहिजे तेव्हढे चिंचगुळाचे पाणी घेऊ शकतो. टिळक रोडवरची कल्पना भेळ पण मस्त आहे. अजून दोन भेळीच्या पद्धती देते.

अजून एक ओली भेळ : चुरमुरे,  (पुदिना, कोथिंबीर व मिरच्या)  अशी एक चटणी आणि आपली नेहेमीची (खजूर, चिंच गुळ ) चटणी घाला. चिरलेला कांदा, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, टोमॅटो व काकडी बारीक चिरून, बारीक शेव, (फरसाण नको) , आणि काही पाणीपुरीच्या पुऱ्या यांचा चुरा घाला. या पद्धतीची भेळ पण खूपच छान लागते. माझी मैत्रिण दिप्ती जोशी ऑफीसमध्ये करून आणायची.

कोरडी भेळ : चुरमुरे, फरसाण, भाजलेले दाणे, बारीक वाटलेल्या हिरव्यागार तिखट मिरच्या, मीठ, खवलेला ओला नारळ, व बारीक चिरलेली कोथिंबीर