तात्पर्य, कोणताही शब्दप्रयोग वापरला तरी कोणाला ना कोणाला त्यातून एखादा अनपेक्षित अर्थबोध होण्याची शक्यता ही नेहमीच
असते. म्हणून शहाण्याने 'दुसऱ्याला यातून काय अर्थबोध होईल' म्हणून आपले शब्दप्रयोग बदलू नयेत.

प्रतिसाद नेहमीप्रमाणे मजेदार आहे. पण वरील वाक्याशी असहमती व्यक्त करण्यासाठी एक वाचलेली कथा सांगतो. कथा रीडर्स डायजेस्ट मधली नाही.  

द.दि.पुंडे यांचे एक मित्र पुणे विद्यापीठात एक काम होते म्हणून पुण्यात आले होते. पुणे स्टेशनवर त्यांनी रिक्षा घेतली आणि रिक्षावाल्याला 'विद्यापीठात चल' असे सांगितले. रिक्षावाल्याने त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर आणून सोडले. त्यांनी रिक्षावाल्याला सांगितले की अरे मला 'पुणे विद्यापीठात जायचे आहे' त्यावर तो म्हणाला. मग युनिव्हर्सिटी म्हणायचं.  विद्यापीठ म्हणजे टिमवि. आणि युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे विद्यापीठ.

समजा आता पुण्यात मी मंडईत चाललो आहे असे म्हटले तर किती लोक वरील  विश्लेषण मनामध्ये करून नक्की भाजीची मंडई की पुस्तकांची मंडई की चित्रपटांची मंडई असा प्रतिप्रश्न करतील? आणि असा प्रतिप्रश्न केल्यास समोरचा माणूस मंडईत जाण्याऐवजी प्रश्नकर्त्याला येरवड्याला जाण्यास मदत  करणार नाही का?

त्यामुळे समोरच्या व्यक्तीला योग्य अर्थबोध होईल असे शब्दप्रयोग करणे हिताचे. जैसा देश तैसा वेश

अवांतर प्रतिसादाबद्दल मनापासून माफी! प्रतिसाद हलकेच घ्यावा.