'मंडई' या शब्दप्रयोगाने पुणेकरांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम भाजीपाल्याच्या आणि फळांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीचे केंद्र जरी उभे राहत असले, तरी 'मंडई' हा शब्द 'मार्केट' अर्थात 'बाजारपेठ' अशा अर्थी बऱ्यापैकी सर्वमान्य, सर्वपरिचित

माझ्या आठवणीप्रमाणे भाजीची मंडई असेल तेथे अमूक अमूक भाजी मंडई असे लिहितात. उदा. कसबा पेठ भाजी मंडई.

मंडई म्हणजे केवळ आठ पाकळ्यांची दगडी इमारत नव्हे. (खरे तर त्या इमारतीतच पूर्वी नगरपालिकाही होती असे वाटते. नक्की माहीत नाही.) मंडईत अंत्यविधीच्या सामानापासून शेतीच्या अवजारांपर्यंत अनेक प्रकारच्या मालाची विक्री होते, असे मला आठवते. आर्यन आणि मिनर्व्हा ही दोन चित्रपटगृहेही मंडईतच होती. अगदी पूर्वी मंडईत सर्कशीचेही खेळ होत असे ऐकल्यासारखे वाटते.

(चू. भू. द्या. घ्या. )