मंदार, रेल्वेच्या सुविधांचा जाहीर पंचनामा घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

जेवढी आसनक्षमता असेल तेवढीच तिकिटे रेल्वेने विकावीत. जास्त तिकिटे देण्याचा रेल्वेला अधिकार नाही.
मात्र रेल्वेने कधी आमची आसनक्षमता संपली म्हणून तिकिटविक्री थांबवल्याचे ऐकले आहे का?
ज्ञात आसनसंख्ये करता अमर्याद तिकिटविक्री करणे हा रेल्वेचा खरा दोष आहे.
ग्राहक सेवांबद्दल बोलणारा कुठलाही रेल्वेचा प्रवक्ता ह्याचे समाधानकारक समर्थन देऊ शकणार नाही.

ग्राहकांनी प्रथम रेल्वेला जेवढी आसनक्षमता उपलब्ध असेल त्या प्रमाणातच तिकिटविक्री करण्यास बाध्य केले पाहिजे.

समस्त मनोगती हो, आपण काय म्हणता?