शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. 

रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते.

मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क क्ल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता.

शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच  मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.