'मंडी'पासून 'मंडई' हा शब्द आला आहे, असावा. हिंदीत सब्ज़ी मंडी, अनाज मंडी, गेहूँ मंडी, तेल मंडी, किताब मंडी अश्या वेगवेगळ्या मंड्या (मंडियाँ) असू शकतात. मराठी मंडई ही हिंदी मंडीपेक्षा फारशी वेगळी नाही, नसावी. त्यामुळे 'मंडई' हा शब्द वाचून कुणाच्या डोळ्यासमोर कुठले चित्र उभे राहील हे सांगता येणार नाही.