का, कुणासाठी अशी ही आर्त गाणी?
गात असते सावळ्या डोहात पाणी
वा...वा...वा...
या कुणाच्या चाहुली अन हालचाली?
का दरीतुन धुमसतो अन धूर खाली?
सुंदर...

सारंग, या ओळी फारच आवडल्या.

रचनेच्या साफसफाईच्या दृष्टीने कविता मुद्दामच ओबडधोबड ठेवली असेल तर तो ज्याचा-त्याचा दृष्टिकोन, पण तसे नसेल तर रचना अधिक गोटीबंद,नीटनेटकीही करता आली असती. असो. भरीचे शब्द शक्यतो टाळावेत (उदाहरणार्थ ः अन् हा शब्द. हा शब्द ओळीच्या सुरवाताला आला तर चालूनही जातो, पण मध्येच आला तर तो भरीचाच वाटतो.वृत्तपूर्तीसाठी आणलेला...!!!)  पण एकूण कविता आवडली. त्यातही वर उल्लेखिलेल्या ओळी उत्तमच.
शुभेच्छा.
पुढील रचनेच्याही प्रतीक्षेत...