मराठीचा आग्रह धरताना आपण नियमितपणे मराठीत लेखन करून दुसर्‍यांना वाचायला गोडी लावून, लिहायला आवड निर्माण करून अश्याप्रकारे आपल्या कृतीतून तो आग्रह दिसला पाहिजे. असे झाले तर मला खात्री आहे आज दोन उद्या वीस आणि परवा दोनशे लोक आनंदाने मराठीत आपसात लेखनवाचनादी व्यवहार करू लागतील.