कच्चे अंडे तेलासोबत फेटून मायोनीज़ बनवतात. त्याचे तंत्र वाटते तितके सोपे नाही. मी एकदा केले होते, तेव्हा पुढचे बरेच दिवस हाताला आठवण होती; केल्याकेल्या ताजी चव (!) चांगली होती, पण थोड्या वेळानंतर अंड्याचा वास यायला लागला. त्यामुळे शेवटी मैत्रिणीच्या आम्लेटात टाकून दिले. (मी जोवर असह्य 'वास' येत नाही तोवर _काहीही_ आहारी आहे.)

तयार मिळणाऱ्या मेयोला फारसा वास नसतो. चव मस्त असते. विशेषतः अर्ध्या कच्च्या भाज्यांबरोबर.

प्रभाकर, मी बारीक चिरलेला कांदा लोणी व पावभाजीमसाल्यात परतून असे सँडविच करते. आता या पाककृतीप्रमाणे प्रयत्न करून पाहीन.