परवा शनिवारी मध्य रेल्वेच्या एका गाडीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात ५ जण किरकोळ जखमी झाले.
हा निव्वळ अपघात होता (अर्थात तो सिलिंडर रेल्वेडब्यातून नेण्याचा वेडेपणा करणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ) त्या स्फोट झालेल्या गाडीने प्रवास पूर्ण केलाच शिवाय नंतर काही फेऱ्याही केल्या . पण वृत्तवाहिन्यांचे "मुंबईमें विस्फोट' चे दळण दळून अफवा पसरवण्याचे काम यथासांग सुरू होते.आक्ख्या मुंबईला घाबवून जखमी करण्याचे काम चॅनेलवाले करत होते असे मटाने केलेले भाष्य योग्यच आहे. त्यामुळे फोनाफोनी सुरू झाली. आणि भ्रमणध्वनि कंपन्यांचा फायदा झाला.
मला असे वाटते की या कंपन्यांचे आणि वृत्तवाहिन्यांचे काहीतरी साटेलोटे असावे.
भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना असेल तर "क्या भारत ऑस्ट्रेलिया को हरा पायेगा? " सारखा निरर्थक प्रश्न एक वृत्त वाहिनी सतत दाखवत राहते. sms ने त्याचे उत्तर पाठवायचे असते. एका संदेशाला ५ रु. तरी पडतात. थोडक्यात लोकांची दिशाभूल करून वा लोकांना मूर्ख बनवून फायदा कमवायचा असे हे तंत्र आहे.