सुधारकाला सुधारणा करायची असते तेव्हा त्या सुधारणांना विचार, बोलणे आणि आचरण ह्या तिन्ही पहाऱ्यांतून पार व्हावे लागते, असे आगरकरांनी लिहिलेले आहे. हा शेवटचा आचरणाचा पहारा फार महत्त्वाचा आहे.
समाजात सुधारणा व्हाव्या म्हणून समाजाच्या रूढींविरूद्ध आचरण करताना धोडो केशव कर्वेंनी सोसलेल्या अपेष्टा सर्वपरिचित आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाची महतीही सर्वांना ज्ञात आहे. किंवा र.धो. कर्वेंनी संततिनियमनाचा प्रचार करताना सोसलेले कष्ट परिचित आहेत.
समाजात सुधारणा व्हाव्या म्हणून गौरी देशपांड्यांनी लेखनकार्याव्यतिरिक्त समाजाविरद्ध आचरण करताना सोसलेल्या कष्तांची मला माहिती नाही. कृपया याविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल.