त्यापुस्तकात गौरी देशपांड्यांचा समावेश आधीच्या कर्व्यांशी तुलना करण्यासाठी केला नसून त्यांच्या सामाजिक वा साहितिक कृतींचा केंद्रबिंदू स्त्री असल्यामुळे केला गेला आहे. गौरी देशपांडेंचा काळ हा अगदी अलिकडचा असल्याने त्यांना टोकाच्या हाल-अपेष्टा वा टीका सहन करावी लागली असणे शक्य नाही.
रधोंच्या लग्नाच्या पंगतीत त्यांचे मुसलमान मित्र जेवले म्हणून धर्ममार्तंडांनी मुलाच्या वडीलांना म्हणजे महर्षी कर्व्यांना आर्थिक दंड केला. असं आज घडणं तितकं साहजिक नाही.