पहिल्या ३ प्रश्नांना "हीरो" ची उत्तरे अशी असायला हवीत की त्यांच्या मुळे फक्त २ संख्या शक्य राहतील आणि त्यातील एकात ४ हा अंक असेल.
पहिल्या ३ प्रश्नांना मिळणारी उत्तरे आणि उरणाऱ्या शक्यता अशा असतीलः
१. हो, हो, हो - ४, १६
२. हो, हो, ना - २, ६, ८, १०, १२, १४, १८, २०
३. हो, ना, हो - ९
४. हो, ना, ना - १, ३, ५, ७, ११, १३, १५, १७, १९
५. ना, हो, हो - ३६
६. ना, हो, ना - २२, २४, २६, २८, ३०, ३२, ३४, ३८, ४०, ४२, ४४, ४६, ४८, ५०
७. ना, ना, हो- २५, ४९
८. ना ना ना - २१, २३, २७, २९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ४१, ४३, ४५, ४७
यावरून "हीरो" ने "हो, हो, हो" किंवा "ना, ना, हो" अशी उत्तरे दिली असतील असे दिसते.
म्हणजे खरी उत्तरे त्यांच्या बरोबर उलट - "ना, ना, ना" किंवा "हो, हो, ना" अशी असणार
आता ४थ्या प्रश्नाचे उत्तर (खोलीच्या क्रमांकात ४ आहे का?) हे "नाही" असेल तर वरील दोन्ही शक्यतांवरून खोली क्रमांक ठरवता येणार नाही, कारण एकापेक्षा जास्त शक्यता उरतात.
तसेच ४थ्या प्रश्नाचे उत्तर "हो" असेल व पहिल्या तिघांची उत्तरे "ना, ना, ना" असतील, तरीही खोली क्रमांक ठरवता येणार नाही कारण एकापेक्षा जास्त शक्यता उरतात.
पण ज्या अर्थी बकुलला खोली क्रमांक ठरवता आला, त्या अर्थी ४थ्या प्रश्नाचे उत्तर "हो" असेल व पहिल्या तिघांची उत्तरे "हो, हो, ना" असायला पाहिजेत - कारण फक्त तेव्हाच १४ हे उत्तर ठरवता येते.
----------------------------------------
बरोबर आहे का?