अनेक विशेष नामांची भाषांतरे(रूपांतरे) होतात. 'इंग्लिश'चे रूपांतर मराठीत इंग्रजी, संस्कृतमध्ये आंग्ल, हिंदीत अंग्रेजी वगैरे. 'डॉइच'चे इंग्रजीत जर्मन आणि संस्कृतमध्ये शार्मण्य. बांग्लाचे मराठीत बंगाली, मलयालमचे मल्याळी, गुजरातीचे गुजराथी, तसे तेलुगुचे तेलगू.  त्यामुळे मराठीत तेलगू लिहिण्यास काहीच हरकत नाही.