पत्कीजीना एखादी चाल सुचते तेव्हा त्यांना संवादिनी वा की बोर्डची गरज नसते. आवडली तर मग ते ती अनेकदा गुणगुणतात. ब-याच वेळा त्यांना ती नंतर खास वाटत नाही. पण स्वतःला जोपर्यंत एखादी चाल आवडत नाही तोपर्यंत ते ती दुस-या कुणालाहि म्हणून दाखवत नाहीत. मग दुसरी चाल. काही चाली मात्र अनेकदा गुणगुणून पण त्यांना चांगलीच वाटते. मगच ते ती इतरांपुढे मांडतात. हा त्यांचा सर्वोत्तमाचा ध्यास त्यांनी कथन केला. त्यांच्या या सर्वोत्तमाच्या ध्यासाला (पॅशन फॉर परफेक्शन) माझा दंडवत.

अत्त्यानंदांच्या स्मरणशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सगळे अचूक लिहिले आहे. धन्यवाद.