दूर व्हायलाच पाहिजेत. परंतु प्रवासी फारच बेशिस्त असतात. रांग कोठेही नसते. दुसऱ्याला ढकलून पुढे घुसणार. त्यामुळे आपल्यालाही तेच करावे लागते. स्वच्छतेचे काय? नरक बरा असेल अशी अवस्था आहे. लोकशाहीत जशी प्रजा असते तसे शासक मिळतात. अखेर शासक येतात कोठून? आपल्यातूनच ना? १०वी नापास आणि इतर बेकार युवकांना अशा बेशिस्त प्रवाशांना दंड करण्याचे अधिकार द्यायला पाहिजेत. हसे नवी मुंबईत काँट्रॅक्ट बेसिसवर  स्वच्छता सेवक आहेत तसे शिस्त लावणारे मार्शल या युवकांमधून निर्माण करायला पाहिजेत. थोडे गैरप्रकार होतील. पण लोक सुधारतील.