आपल्या समाजात डॉक्टरांना खूपच वरचे स्थान आहे आणि त्याचा ते गैरफायदा घेतात, असे माझे प्रामाणिक मत आहे. तुम्ही म्हणत असलेले "साटेलोटे" अगदी खरे आहेत पण मेडिकल रेप्रेसेंटेटिव अथवा औषध दुकानदाराला दोष देण्यात काही अर्थ नाही. ह्या लोकांचा धंदा डॉक्टरांवर अवलंबून असल्याने त्यांना डॉक्टर लोकांच्या मर्जीत राहण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात (ह्याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टी चालवून घ्याव्यात)
मेडिकल रेप्रेसेंटेटिव लोकांना डॉक्टरलोक कसे वागवतात हे एखाद्या मेडिकल रेप्रेसेंटेटिवला विचारून पाहा. उद्धटपणा अगदी पावलोपावली असतो. विश्वास ठेवा, ह्या समाजात फार कमी डॉक्टर आहेत की जे पेश्याशी इमान बाळगून सेवा करतात. पैशासाठी हपापलेला दुसरा कोणताही पेशा मी आजवर बघितलेला नाही. ह्या category मधील फार कमी लोक income tax भरतात, हा एक दुसरा मुद्दा.
Late 90s मध्ये मी एका नामांकित औषध कंपनीमध्ये clinical trial administer करत असताना माझा पूर्णं भारतातील ७२ डॉक्टरशी संपर्क होता. ह्या सर्व डॉक्टरांना ह्या कामाचे पगाराशिवाय (भरमसाठ) पैसे मिळतात. किती रुग्ण ते trial मध्ये enroll होऊन successfully passout होतात ह्यावर त्यांना बोनस होता (कारण आम्हालाही आमचे taregt वेळेत पूर्णं करून FDA कडे application submit करायचे होते.) पण ही डॉक्टर मंडळी minimum criteria fulfill न करणारा रुग्ण खुशाल admit करून घेत. हे आम्हालाही कळे की हा रुग्ण द्वितीय stage मध्ये जाणार नाही पण आम्ही काहीही बोलू शकत नसू कारण त्यांचा इगो मध्या येत असे. नेहमी पंचतारांकित हॉटेलमध्ये treat साठी तगादा, (दिवाळी) गिफ्टसाठी तगादा, (in the form of meeting) सहलीसाठी तगादा ह्या गोष्टीतर नेहमीच्या असायच्या. खरंच अगदी वैताग आला होता. कळस म्हणजे अहो साधा १० रुपयांचा पेनही बिनदिक्कतपणे ढापत. इतका cheap attitude मी आजवर कोणाचाही बघितलेला नाही. शेवटी आम्ही वैतागून उत्तर भारतातील एका नामांकित इस्पितळातील trial बंद केली.
ह्या सगळ्या कथेचे conclusion, सगळे डॉक्टर cheap असा करू नका. ह्या चमूमध्ये मला फक्त ४च डॉक्टर असे सापडले की ते इतर डॉक्टरांसाठी role model आहेत. नंतर त्यांना कंपनीकडून मिळणारे benefits देखील वाढले पण मला वाटते की त्यासाठी ते लायक आहेत. त्यांचे नेहमीचे शब्द असत, आम्हाला कंपनीसाठी काही करायला सांगाल तर ते रुग्णाच्या हिताचे असल्याशिवाय आम्ही करणार नाही.
तुम्ही औषधांबद्दल बोलत आहात तेही खरे होते पण बरीच नवीन औषधे बाजारात येत आहेत. आपल्याला अनेक आजारांबद्दल असलेले ज्ञान नवीन औषधे बनविण्यासाठी पुरेसे नाही त्यामुळे आपल्याला प्रथम आजार समजून घेणे जरूरीचे आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा खर्च अमाप आहे. हा खर्च प्रत्येक कंपनीला भरून काढणे जरूरीचे आहे. त्यावर नफाही काढणे जरूरीचे आहे तरच त्यांचा धंधा चालेल आणि नवीन औषधे निघू शकतील. मला ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटते की लोकांना डॉक्टरची फीपेक्षा औषधीची किंमत जास्त जाचक वाटते. ते औषध शोधून काढताना/बनविताना येणारा खर्च कोणीच लक्षात घेत नाही!!