ते न्याय्य बाजू न घेता तटस्थ रहात. 'रधों'वर समाज तुटून पडला असताना आणि त्यांच्या निस्पृह वृत्तीची जाणीव असतानाही कर्व्यांनी रधोंची बाजू घेतली नाही. किंबहुना रधोंची बाजू घेण्याने त्यांच्या शिक्षण संस्थेवर परिणाम होईल याची पूरेपूर माहिती असल्याने ते गप्प बसले.

हे वाचून धक्काच बसला. पण त्यांच्या संयमाचे कौतुक करावे लागते. आवेशात येऊन कार्याची वाट लावण्यापेक्षा त्यांनी व्यावहारिक मार्ग निवडला.

चांगल्या रसास्वादाबद्दल अभिनंदन व धन्यवाद. परंतु प्रकाशकाचे नाव व टे. क्र. दिल्यास पुस्तक विकत घेणे सोपे पडते.