आधीची उत्तरे नाही, नाही, हो, नाही अशी असल्याने बकुलला २५ वाटले कारण २५ किंवा ४९ असे उत्तर पहिल्या तीन उत्तरांवरून मिळाले होते.
पण नंतर चुकीच्या दुरुस्ती नंतर हो, हो, नाही, हो असे केल्यावर १४ हे उत्तर मिळाले.
(खोलीच्या क्रमांकात ४ आहे का हे चुकीच्या दुरुस्तीनंतर सोपे जावे म्हणून विचारले की काय ? कारण २५ किंवा ४९ यापैकी एक ठरवायला एवढ्याच एका प्रश्नाची काय जरूरी? संख्येत २ आहे का असा चौथा प्रश्न असता तर चुकीची दुरुस्ती झाल्यावर २ किंवा १२ किंवा २० असे उत्तर आले असते !)
समजा आधी हो, हो, नाही असे केल्यावर २,६,८,१०,१२,१४,१८,२० यापैकी ४ आहे का याला नाही या उत्तराने पाचवा प्रश्न विचारावा लागला असता तो लागला नाही, म्हणजे दुरुस्तीच्याआधी नाही, नाही, हो हीच उत्तरे असणार)
कोडे आवडले. धन्यवाद.