वैद्यकीय पदवीधारकांबद्दल आपण मांडलेल्या सर्व व्यथा जरी खऱ्या असल्या तरी आपण मांडलेल्या मतांशी मी असहमत आहे. ह्याची कारणे पुढीलप्रमाणे-
१. "इंटर्नशिपसह कोर्स पूर्ण होण्यास सध्याच्या अभ्यासक्रमात बारावीनंतर साडेपाच वर्षे लागतात आणि त्यानंतर लगेच लठ्ठ पगाराची नोकरी मिळत नाही किंवा प्रॅक्टिसही सुरू करता येत नाही." = ही माहिती सगळ्यांना अभ्यासक्रम सुरू होण्याअगोदर माहीत असते. सगळ्यांना हेही माहीत असते की लग्नाचे वय उलटून जाईल अथवा लगेच दुकान टाकू शकणार नाही म्हणुन, मग पदवी संपल्यावर ही ओरड करणे मला चुकीचे वाटते.
२. एम. बी. बी. एस्. होताच लठ्ठ पगाराची नोकरी न मिळता या डॉक्टरांना केवळ मासिक १७००/- रुपये विद्यावेतनावर काम करावे लागते त्याचवेळी त्यांच्या अगोदर बी.ई. झालेले त्यांच्या बरोबरीचे विद्यार्थी मासिक कमीतकमी १५-२० हजार रुपये पगार भारतात घेतात किंवा परदेशाची वाट धरतात. = मग हे विद्यार्थी देखील बी.ई.ला का जात नाहीत?
२. पदव्युत्तर अभ्यासक्रम जर त्यांना "अतिशय त्रासदायक" वाटत असेल तर त्यांनी तो करू नये (आणि तो न केल्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे)
३. "वैद्यकीय पदवीधारकांना परदेशात विशेषतः अमेरिकेत जाण्याचे वेध लागले असतात हा तर संपादकांच्या अज्ञानाचा मोठाच पुरावा आहे कारण या पदवीधारकांना बहुधा अमेरिकेचा व्हिसा मिळतच नाही आणि मिळाला तरी अमेरिकेतील योग्य वैद्यकीय पदवी असल्याशिवाय नोकरी किंवा खाजगी प्रॅक्टिसही करता येत नाही.या गोष्टीची त्यांना कल्पना नसावी असे दिसते." = माफ करा पण ह्यातील आपले ज्ञान थोडे तोकडे आहे. अमेरिकेत जाणारे वैद्यकीय पदवीधारक फक्त प्रॅक्टिससाठीच जात नाहीत तर त्यांना इतरही बरीच क्षेत्रे आहेत. मी अनेक भारतीय डॉक्टर आपली प्रॅक्टिस सोडून अमेरिकेत आलेले बघितले आहेत. ते रिसर्च करता करता अमेरिकेची license test घेतात आणि इकडेच स्थायिक होतात.
४. वैद्यकीय पदवीधारक जेव्हा एकटे काम करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना मदत होते ती त्यांनी केलेल्या इंटर्नशिपच्या अनुभवाची. जितका जास्त अनुभव तितके चांगले (म्हणून त्यांनी तेच करू नये) उदा. जर तुमची एखादी शस्त्रक्रिया होणार असेल तर तुम्ही नवशिक्या वैद्यकीय पदवीधारकाकडे जाणे का टाळता?
वैद्यकीय शिक्षण क्षेत्र म्हणजे वैयक्तिक जीवनात खूप compromise आहे, ह्या बाबतीतला निर्णय अगोदरच घेतलेला बरा. शेवटी ओरड करणे चुकीचे आहे असे माझे ठाम मत आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना होती आणि मला त्या असहमत होत्या म्हणून मी वैद्यकीय क्षेत्र निवडले नाही. आजवर मला ह्या निर्णयाचा पश्चाताप झालेला नाही.