कार्यालयात दुपारच्या जेवणानंतर बडीशेपेसारखी ही कथा/अनुभव जे काही आहे ते वाचले, आणि तृप्तीचा ढेकर दिला. लेखन फार आवडले, हे वेगळे सांगायलाच नको. माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला हिमालयातल्या एखाद्या भव्य सुळक्यावर न्यावे. ते अवघड असेल तर एखाद्या सरकारी कार्यालयात न्यावे. सगळा नक्षा उतरतो, "मग?" मी त्यांना एक रुपयाची लाच देतो आहे की काय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता, बाई आता 'इश्श' म्हणून एखादा मुरका मारतात की काय  या शंकेने मी कसासाच झालो इ. इ. म्हणजे कळस!!! फारच आवडले.