जयुच्या 'सारे तुझ्यात आहे' या आल्बमच्या (ध्वनी तबकडीच्या सीडी च्या) प्रकाशन सोहळयाचा हा वृत्तांत इकडे दिल्याबद्दल तुम्हा दोघांनाही मनः पूर्वक धन्यवाद. प्रत्यक्ष हजर न राहू शकल्याचा सल थोडासा कमी झाला त्यामुळे.
आणि हे नाव मी सुचवलं वगैरेबद्दल थोडंसं, खरंतर हे तीच्याच एका कवितेच नाव आहे, मी फक्त "हेच नाव छान आहे की अल्बमसाठी", एवढंच सुचवलं होतं, तिनी याचं श्रेय मला दिलं हा तीच्या मनाचा मोठेपणा आहे. खरोखर यात माझं काहीही कर्तृत्व नाहीये.
जयुला खूप खूप शुभेच्छा.