एखाद्या कवितेचे विडंबन तात्काळ होण्यास हरकत असण्याचे कारण नाही असे मला वाटते. उलट जर कविता आणि विडंबन हे लगोलग घडले तर वाचताना मजा येते; मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतर मूळ कविता व संदर्भ वाचकांच्या लक्षात राहीलच असे नाही व त्यामुळे विडंबन वाचताना दुवा वापरून मूळ कविता वाचावी लागेल.

अर्थात ज्या वाचकांना तात्काळ वाचायला आवडत नसेल, त्यांनी ते सावकाश हवे तेव्हा वाचावे. साधारणतः विडंबनकार ते काव्य म्हणजे कुणाच्या तरी काव्याचे विडंबन आहे हे आधीच सांगतात, शिवाय मूळ कवितेचा दुवा देतात/ किमान उल्लेख तरी करतातच त्यामुळे ज्यांना ते वाचायचे नसेल ते न वाचता मागे फिरू शकतात.

हरणटोळ महाशय,

अत्रे हे उत्तम कवी होते, लेखक होते, नाटककार होते, वक्ते होते, ते महाराष्ट्राचे खरे साहेब होते. अगदी निर्विवाद. पण त्यांनी स्वतःच्या कवितांचे विडंबन केलेले वाचण्यात आलेले नाही. अहो हे म्हणजे स्वतःची उत्तरपत्रिका स्वतः तपासण्यासारखे वा आपल्या कवितेचे आपणच कौतुक करण्यासारखे आहे. विडंबन म्हणजे टींगल नाही तर मुळ काव्या बरहुकुम पण दुसऱ्या आशयाचे प्रतिकाव्य निर्माण करण्यासारखे आहे.