एखाद्या कवितेचे विडंबन तात्काळ होण्यास हरकत असण्याचे कारण नाही असे मला वाटते. उलट जर कविता आणि विडंबन हे लगोलग घडले तर वाचताना मजा येते;

अगदी १००% सहमत.. विडंबन लगेचच यावे  त्याची खुमारी काही औरच!!! .. शिवाय ह्या विडंबनसम्राटांच्या प्रतिभेचा आवाका फार मोठा आहे त्यामुळे इतक्या कमी वेळात विडंबन होऊन आपणास ते वाचायला मिळते हे मी माझे भाग्यच समजतो :)

मी तर असेही म्हणेन की कोणत्याही कवीला त्याच्या कवितेच्या विडंबनाइतकी दाद क्वचितच मिळत असेल नाही का?

- ऋषिकेश