मुळ कविता वाचन आणि विडंबन काव्य वाचन यात बराच फरक आहे. दारू प्राशन , लाथा बुक्क्या या विषयात्मक विडंबनाने काही काळ मनोरंजन होत असेलही परंतु या सगळ्यात दर्जेदार कवीं आणि कवयित्रींच्या मुळ कवितेला म्हणावा तेवढा प्रतिसाद आणि सन्मान दिला जातोय का एवढाच प्रश्न आहे.

--- सहमत आहे. पण सध्या यत्रतत्र कुत्र्यांच्या छत्र्यांगत जी विडंबने उगवत असतात, त्यांतील मुद्दे, भाषिक दिवाळखोरी, धोरणी मांडामांड हे सगळे लक्षात घेतलेत, तर तुमच्या या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. आणि त्यावरही कळस म्हणजे असे स्पष्ट अंगुलिनिर्देश करण्यास वैचारीक दिवाळखोरीचे लेबल निर्लज्जपणे चिकटवले जात असते

कदाचित रसिक वाचकांची आवड बदलते आहे असे ही असेल ??

--- आवड? सध्या ज्या धाटणीची, ज्या विषयांवरची आणि ज्या शब्दयोजना असलेली आणि वेळप्रसंगी कीव करण्याजोगे मुद्दे असलेली विडंबने, विविध मराठी संकेतस्थळांवर येत आहेत, ते पाहून वाचकांना जे आवडते, त्याला आवड म्हणावे, रसिकता म्हणावे की रसिकतेचा ऱ्हास की अजून काही, हे कळेनासे झाले आहे.

त्यामुळे तुमच्या वरील प्रतिसादातील 'असो' हेच सारे काही सांगून जाते, असे तुम्हाला नाही का वाटत?