आज अवकाशयान पाहण्यासाठी रात्री ८ वाजण्यापूर्वी पश्चिम दिशेकडे तोंड करून उभे राहा व लक्ष साधारणपणे डावीकडे असू द्या. गच्ची किंवा मोकळे मैदान असल्यास उत्तम.

बरोबर ८ वाजता क्षितीजापासून १० अंशावर अवकाशयान दिसायला लागेल व हळुहळू वर चढत ते उत्तरेकडे सरकू लागेल. जास्तीत जास्त ३५ अंशाची उंची गाठून ते उत्तरेकडे क्षितीजापासून २० अंशावर लुप्त होईल. हा प्रवास ४ मिनिटांचा असेल. जसे जसे यान आकाशात वर येईल तसतशी त्याची तेजस्विता वाढत जाईल व उत्तरेकडे जाताना ते निस्तेज होत दिसेनासे होईल. एखादा तारा/ग्रह आकाशात सरकतो आहे अशा प्रकारचे हे दृश्य असेल.

यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. पण चांगली द्विनेत्री असल्यास त्यातून अधिक ठळकपणे दिसेल.

अवकाशयानाचे कोणतेही भाग दिसू शकणार नाहीत.