दक्षिणेचे उदाहरण देउन बोलायचे झाले तर ..
"मराठी यायला पाहिजे," ही अपेक्षा ही न ठेवता "मराठी यायला'च' पाहिजे" अशी मग्रूर परिस्थिती असणे जास्त भल्याचे होते. नवे नवे भाषिक लोंढे दक्षिणेच्या शहरात ही दाखल होतात पण स्थानिकांशी जुळवुन घेण्यात व त्यांची भाषा शिकण्यात भले आहे हे लौकरच त्यांच्या ध्यानी येते.
खरे पाहता नवे स्थलांतरित स्थानिक भाषेचे नवे दुत होउन त्या भाषेचे महत्व वाढवण्यास मदत करतात. इंग्रजी या बाबतचे उत्तम उदा. म्हणता येईल. मराठीचे आदिकवींपैकी एक चक्रधर जन्माने मराठी नव्हते.(चुभु देणेघेणे)...
मराठीचा आग्रह आपण अश्याच सकारात्मक अर्थाने धरल्यास ते मराठीच्य भल्याचे राहील
टीप : जगात इंग्रजी अव्वल असावी या साठी कोणता ठराव युनोमध्ये पारित झाला होता काय ?