मूळ कविता कशी आहे त्याचा विचार केल्याशिवाय विडंबन करू नये, असे मला वाटते. मूळ कविता जर तितकी ताकदीची नसेल, विशेष प्रसिद्ध नसेल तर तिचे विडंबन करू नये असे मला वाटते. अशा कवितेचे विडंबन करण्याने केवळ आपल्या विडंबनाची शेखी मिरवली जाते. विडंबन आणि कविता ह्यांच्यात काहीतरी विरोधाचे नाते सांगता आले पाहिजे. केवळ कवितेतली यमके आणि वृत्त वापरल्याने ते त्या कवितेचे विडंबन होत नाही. बऱ्याचदा अशा विडंबनांतून एकच एक कविता पुन्हा पुन्हा निरनिराळ्या कावितेच्या वृत्तांतून आणि यमके वापरून प्रसिद्ध केली जाते. म्हणजे कविता निररनिराळ्या पण विडंबन एकच!
त्याला विडंबन का म्हणायचे? कित्येकजण मला अशी विडंबने पाडून दाखवतात. ओळख आणि मैत्री साठी मीही वाहवा क्याबात है वगरे म्हणतो. मात्र अशी विडंबने म्हणजे एक किमान मापन आहे. ज्याला चांगले विडंबन करायचे त्याने त्याच्यावरच्या दर्जाचे विडंबन येत असेल तर करावे असेच आपोआप सुचवले जाते.