विडंबनकारांनाही स्वतःची मते आहेत हे लक्षात असू द्या

मते सर्वांनाच आहेत. तसेच माझे मत मी वर मांडले हे तुमच्या लक्षात आले ही चांगली गोष्ट आहे. माझी एक विनंती आहे. आपण आपले एखादे चांगले विडंबन सादर करून मूळ कविता देऊन, तिचे ते विडंबन करण्याची आपली भूमिका समजावून सांगितलीत तर अनेकांना आनंद होईल. केशवकुमार (अत्रे) ह्यांची कित्येक विडंबने मूळ कविता समजल्याशिवाय समजत नाहीत, त्यांची मजा घेता येत नाही; असे मला वाटते. ह्यामुद्द्याने विडंबन मूळ लेखनावर 'अवलंबून' असावे  (अमवा) विडंबनाला मूळ कवितेची आवश्यकता नसेल तर तिला विडंबन का म्हणायचे? विनोदी कविता म्हणता येईल.