वरील मतातील मुद्द्याशी पूर्ण सहमत आहे. याबाबत अधिक उद्बोधक मतमतांतरे येथे वाचता येतील.
बाकी मुक्त व्यासपीठ, लेखनस्वातंत्र्य वगैरेचा जयजयकार म्हणजे आपली धोरणे व शब्दच्छल यांच्या समर्थनार्थ केवळ निमित्त, बाकी काही नाही. व्यासपीठ जितके मुक्त तितके लेखक, कवी, विडंबनकार यांच्यावरील जबाबदारी अधिक, असे मला वाटते. दुर्दैवाने काही अपवादात्मक रचना वगळता ती पेलली गेलेली दिसत नाही. उलट मिळणारे प्रतिसाद हे व्यापक वाचक समुदायाकडून नसून विशिष्ट वाचकवर्गाकडून असल्याने मग अशा धोरणी रचना, तेचतेच विषय, इकडचे शब्द तिकडे, तीचतीच यमके व वृत्ते यांच्या सरबत्तीतून अशा ठराविक वाचकवर्गाच्या गळी उतरवणे नि त्यांच्याकडून वाहवा मिळवणे, यात कोणतेही कौशल्य, पराक्रम किंवा प्रतिभा नाही.