प्रस्तुत चर्चेत किंवा इतरत्रही विडंबन करण्याला कोणाचा विरोध आहे, असे दिसत नाही. तसे असते तर झेंडूची फुले वगैरे काही अस्तित्त्वातच आले नसते. मात्र विडंबन कोणत्या कवितेचे व कसे करावे यामागच्या तर्काला, विचारपद्धतीला, विडंबनातील विषय, शब्दयोजना इत्यादींना, विडंबनाची समयोचितता या मुद्द्यांवर चर्चा, आक्षेप, मतमतांतरे अपेक्षित आहेत. त्यामुळे मूळ कवींना न्यूनगंडाने ग्रासले असावे, विडंबनाला विरोध करणे म्हणजे प्रश्नांना घाबरून परीक्षा टाळण्याचा प्रकार आहे असे आरोप तद्दन खोडसाळ नि बिनबुडाचे आहेत, असे वाटते.