'भाषिक दिवाळखोरी' सप्रमाण सिद्ध करू का? विडंबनातील भाषिक दिवाळखोरीचे नमुने हे पाहा - दिव्वाळखोरी (मूळ शब्द - दिवाळखोरी), प्रतिसादांनची (मूळ शब्द - प्रतिसादांची), मालाच (मूळ शब्द - मलाच). आणि गंमत अशी की मालाच ऐवजी मजलाच यांसारखे सोपे बदल करून गेयता, वृत्त सगळे सांभाळणे सहज शक्य आहे. पण तसे न करण्याचे धोरणच असेल, तर त्यास कोणाचा काय इलाज? ऱ्हस्वदीर्घाची सूट वगैरे घेणे अशी तडजोड, गरज इ. समजू शकते. पण येथे तडजोड नाही, हेका (स्पष्ट) दिसतो.
आता वैचारीक दिवाळखोरी सप्रमाण सिद्ध करून दाखवता का?