वेगळ्या मुद्यास्तव हा वेगळा प्रतिसाद.

मुळात, आमची आवड ही रसिकता आणि तुमची किंव इतरांची म्हणजे तिचा ऱ्हास, असे कुठेही म्हटलेले नाही. रसिकता अशी ऑब्जेक्टिवली मेजरेबल असती, तिची सर्वमान्य व्याख्या असती, तर काय आनंदीआनंद! पण 'आवड' किंवा 'रसिकता' कुठे कशी दिसून येते, यावरूनही ती आपलेआप स्पष्ट होतच असते, नाही का?  माझ्यामते यावरूनच काय ते स्पष्ट झाले असेल. कुणाला कुणी दाक्षिणात्य नटी आवडते म्हणून तिची शुभेच्छापत्रे वाटत फिरावयाचे आणि तसेच शुभेच्छापत्र कुण्या दुसऱ्या/री ने दुसऱ्याच कोणा नटीचे फिरवले, की ओंगळ, बीभत्स म्हणून बोंबलायचे, ही जर रसिकता असेल, तर प्रश्नच मिटला नाही का? साडीचोळी आवडणाऱ्यांनी बिकिनी आवडणाऱ्यांनी आणि vice versa शिव्या घालणे आणि अरसिक संबोधणे हे अपेक्षितच; पण या सगळ्याकडे निष्पक्षपातीपणे पाहिले की रसिकता म्हणजे काय आणि हिडीसपणा, अरसिकता, ओंगळपणा इ. म्हणजे काय, हे कळतेच की नाही? हिमेश रेशमियाचे संगीत ते संगीत नाहीच; आणि भीमसेन जोशींचे संगीत म्हणजेच संगीत? म्हणजे हिमेश आवडणारे अरसिक नि मठ्ठ नि भीमसेन आवडणारे ते खरे रसिक, दर्दी!? वाद घालायला हेही पुरेसे आहे; पण जरा स्वतःलाच प्रश्न विचारून पाहिला किंवा तिऱ्हाईतास विचारून पाहिला, तर खरे उत्तर मिळेलच.

माझ्याकडून रसिकतेविषयीचे हे स्पष्टीकरण पुरेसे वाटते. याउप्पर काय तो धुडगूस घालायला तुम्ही समर्थ आहातच. त्यासाठी शुभेच्छा आणि माझे मत मांडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.