विडंबन ही मूळ कवितेला दिलेली दाद असते. काही वेळेस असे होते की नजरचुकीने वाचायची राहिलेली एखादी उत्तम कविता या निमित्ताने वाचली जाते. प्रदीप कुलकर्णींच्या गझलांचा शोध मला असाच लागला.

विविध सामाजिक घटना, प्रवृत्ती, विसंगती यांवर भाष्य करण्याचे विडंबन हे अतिशय  प्रभावी माध्यम आहे. दारूकाम आणि तशाच इतर विषयांवरची विडंबने वाचून दोन घटका करमणूक होते, विडंबनकाराचे कौतुक जरूर वाटते, पण त्यात टिकाऊ असे विशेष काही सापडेलच असे नाही. काही विडंबने मात्र दर्जेदार असतात, ती जास्त लक्षात राहतात.