मलासुद्धा आईने असेच शिकवले होते.

आणि माझ्या स्मरण शक्तीनुसार रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करते...

घड्याळात वाजले चार
दादाने दिला मार
मार खाण्यात एक तास गेला
बाई मी नाही अभ्यास केला    (या बाबत मी फार साशंक आहे. पण जे आठवले ते लिहिले.)

घड्याळात वाजले दहा
आरशात तोंड पाहा
आरशात बघण्यात एक तास गेला
बाई मी नाही अभ्यास केला

घड्याळात वाजले अकरा
घरात शिरला बकरा
बकरा हाकलण्यात एक तास गेला
बाई मी नाही अभ्यास केला