एखादे लिखाण संकेतस्थळाच्या धोरणाशी सुसंगत असेपर्यंत त्याला आडकाठी नसते, नसावी असा अनुभव आहे. एखाद्या संकेतस्थळावर कुणी काय किती लिहायचे ह्याबद्दल आपण केवळ अपेक्षचा व्यक्त करू शकतो ह्या अपेक्षांना तसा काहीच अर्थ नसतो. विडंबन कशाचे करावे आणि कशाचे करू नये हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न. माझ्या मते इतर कुठल्याही विडंबनाला कुठलाही कवी, विषय, कविता अस्पृश्य नसते, नसावी. विडंबनांच्या नावाने त्रागा करून काही हशील नाही.

अर्थात अती झाले की हसू येणारच. मग त्या घाण्यातल्या कविता असोत, रिकाम्या-जागा-भरा छाप विडंबने असोत वा माझं-तेवढं-खरं-आणि-मला-तुझ्याहून-अधिक-कळतं छाप तिरपे प्रतिसाद असोत.

अवांतर:
"ओळख आणि मैत्री साठी मीही वाहवा क्याबात है वगरे म्हणतो,"वर देऊळगावकरांनी जे विडंबनाबाबत म्हटले आहे ते कवितांनाही लागू आहेच.