पद्धतः

(१) पहिल्या रांगेत आहे का?

(२) क्रमांक सम आहे का?

(३) तो क्रमांक पूर्ण वर्ग आहे का?

(४) त्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?

या प्रत्येक प्रश्नाला 'हो' आणि 'नाही' अशी दोन उत्तरे शक्य आहेत. त्याप्रमाणे एकंदरीत १६ शक्यता मांडता येतात. त्यातील काही शक्यता प्रत्यक्षात उतरवता येत नाहीत (उदाहरणार्थ, पहिल्या रांगेत आहे, सम नाही, पूर्ण वर्ग नाही, पण त्यात ४ हा आकडा आहे).

तिला जे उत्तर मिळाले, ते यातील अशा एका शक्यता-संचाचे मिळाले की जिथे एकच आकडा त्या संचातल्या शक्यता पूर्ण करणारा असू शकतो. आणि त्यातील प्रत्येक उत्तर बदलले, तरीही एकच आकडा त्या बदललेल्या शक्यता-संचाचे उत्तर म्हणून मिळतो.

आधी हो - हो - नाही - हो या उत्तरांनी तिला १४ हा आकडा मिळाला. मग नाही - नाही - हो - नाही या उत्तरांनी तिला २५ हा आकडा मिळाला.