श्री प्रदीपजी,
तुमच्या खुलाशाबद्दल धन्यवाद... मीही माझ्या अभिप्रायात लिहिले आहेच की कवीने जगाशी जुळलेली नाळ तोडण्याबाबत उल्लेख केला असेल म्हणून. पण ते तसे सरळ सरळ समोर येत नाही याचे कारण कवितेच्या मुळाशी असलेल्या उलट्या, अशक्य प्रवासाचा ध्यास... पण तुम्ही दिलेला खुलासा नक्कीच पटतो आणि तशी अंधुक कल्पना आधीच येते, त्यामुळे प्रयत्न पूर्णपणे फसला असे म्हणता येणार नाही, पण पूर्ण यशस्वी झाला असेही म्हणता येणार नाही.
एक आवर्जून सांगावेसे... तुमच्या कवितेतील गोटीबंदपणा आवडला. फार विचारपूर्वक शब्दयोजन आणि तितकाच प्रभावी विषय यामुळे कविता उठून दिसते!