मी याआधी ठरवून इरीडियम फ्लेअर पाहिलेला नाही. एकदा पहाटे सहज म्हणून आकाशात पाहिले तेव्हा योगायोगानेच दिसला होता. आपण दिलेल्या दुव्या वरून मुंबईमधून कधी दिसेल ते शोधले असता आज संध्याकाळी ७:२७ ला दिसेल.

हा फ्लेअर -८ प्रतीचा दिसणार असून तो आग्नेय दिशेस (Azimuth = १६२ अंश ) ५६ अंश उंचीवर दिसेल. हा इरिडियम ३६ उपग्रह असेल.  

या पुढील प्रकाशशलाका (फ्लेअर साठी हा शब्द कसा आहे?) २६,२७,२८,२९,३१ मार्च या सर्व दिवशी पहाटे दिसणार आहे.