मनोगतावर लेखन करताना लेखातील इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतर करून लिहावे किंवा ते अशक्य असल्यास आपल्या उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत.
तुम्ही व्हॉलिबॉल कोर्टस, वॉर्म-अप, ब्लॉक,टाईम आऊट, सीनियर टीम, ऍवॉर्ड विनर, सर्व्हिस, स्मॅश, फिनिश इ. शब्द ह्याप्रकारे लिहून योग्य दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही शब्द अशाच पद्धतीने लिहायला किंचितच जास्त वेळ लागेल असे वाटते.
दर्जेदार आणि लोकप्रियतेच्या मार्गावर असणाऱ्या लेखनात ही काळजी विशेषकरून घेतली जावी अशी प्रशासनाची भूमिका आहे.
कृपया पुढील लेखांकांत ह्या दृष्टीने सहकार्य करावे.