चार प्रश्न आहेत. हो किंवा नाही हीच उत्तरे आहेत.
तीन प्रश्न झाल्यावर चौथ्याची गरज पडली म्हणजे पहिल्या तीन उत्तरांमुळे एकाहून अधिक उत्तरे मिळतात. आणि चवथ्या (हो-नाही) उत्तरानंतर एकच उत्तर मिळते.
प्रश्न एक ते चार यांचे हो किंवा नाही अशा प्रकारे सत्यता-सारिणी (ट्रुथ टेबल ?) मांडल्यास सोळा उत्तरे मिळतात.
त्यात
१. हो, हो, हो, हो = उत्तर ४
२. हो, हो, हो, नाही = उत्तर १६
३. हो, हो, नाही, हो = उत्तर १४
४. नाही, नाही, हो, हो = उत्तर ४९
५. नाही, नाही, हो, नाही = उत्तर २५
एवढीच उत्तरे ग्राह्य ठरतात. (कारण अन्य पर्यायात चवथ्या प्रश्नानंतर एकाहून अधिक उत्तरे येतात किंवा एकही उत्तर येत नाही किंवा तीनच प्रश्नांनतर एकच आकडा मिळतो, व चवथ्याची गरज उरत नाही.)
त्यापैकी एक उतर आधी आले, व त्याच्या बरोबर उलट (हो च्या जागी नाही, नाही च्या जागी हो असे) घेऊन दुसरे उत्तर आले.
या कसोटीवर फक्त ३ व ५ टिकू शकतात.
समजा ३ चा पर्याय आधी आला असता, तर पहिल्या तीन प्रश्नांच्या उत्तरांवरून आलेल्या २, ६, ८, १२, १४, १८ व २० एवढ्या उत्तरांतून एकाची निवड करण्यासाठी उत्तरात ४ आहे का हा प्रश्न विचारून हवे ते उत्तर मिळेलच असे नाही (समजा उत्तर "नाही" असे असते, तर वरील इतर सहापैकी कोणते ते ठरवायला पुन्हा विचारावे लागले असते) याचा अर्थ पर्याय ५ चे उत्तर आधी मिळाले व नंतर चुकीची दुरुस्ती केल्यावर पर्याय ३ चे उत्तर मिळाले, जे योग्य उत्तर होते (एकदाचे).
(पण पर्याय ५ चा विचार करता, पहिल्या तीन उत्तरांवरून २५ व ४९ अशी उत्तरे येतात. त्यापैकी एक उत्तर ठरवायला उत्तरात ४ आहे का म्हणूनच का विचारले? तसे विचारयच्या ऐवजी २ किंवा ५ किंवा ९ आहे का असे ही विचारता आले असते व उत्तर मिळाले असतेच. परंतु उत्तरात ४ आहे का हाच प्रश्न विचारला कारण बाकीच्या प्रश्नांचा "विरुद्ध उत्तरे" घेतल्यावर काहीच उपयोग नव्हता, नाही का. )
पण कोडे सोडवायला मजा आली. धन्यवाद.