बोलण्याने फक्त शब्दांची वाफ हवेत विरते. लिहिण्यानेच तिला वजन प्राप्त होऊन त्यातूनच ज्ञानाची ज्योत पेटू शकते व त्याच्या प्रकाशाने ते लिखित शब्द इतरांच्या कामी येऊ शकतात. लिहीणं म्हणजे तरी काय? तर सांकेतिक चिन्हं काढणं. व वाचणं म्हणजे काय तर त्या चिन्हांनातील सांकेतिक अर्थ काढून घेणं. म्हणजेच 'ENCODING' व 'DECODING'. लिखित शब्दांचे महत्त्व पाश्चात्य जाणतात म्हणूनच तर त्यांनी त्याच्या कष्टांना 'कॉपी राईट', 'पेटंट' ह्या लिखित कागदांच्या ताकदीद्वारे ENCASH करून ते पैसा कमावीत आहेत.