ह्या 'हृदयस्पर्शी' कवितेवरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एका व्याख्यानात सांगितलेला एक अनुभव आठवला.
शास्त्रीजींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला होता. त्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. एकदा ते तुरुंगात असताना दिवाळी आली. कैद्यांच्या आप्तांनी तिथे फराळाचे पाठवले होते. तुरुंगात अगदी आनंदीआनंद झाला नसला तरी दिवाळीचे थोडेफार वातावरण निर्माण झाले. तेवढ्यात एक कैदी शास्त्रीजींजवळ आला. त्याला दुसऱ्या दिवशी फाशी देण्यात येणार होते. त्या कैद्याने शास्त्रीजींना नमस्कार केला आणि करुण हसत म्हणाला, "आज दिवाळी, उद्या आमची देवदिवाळी!"
(कविता खरोखर हृदयाला स्पर्शून गेली.)