गायलो मी इथे चूक होती
वेदना ही बरी मूक होती
वंचनेची मिळाली बिदागी
सगळीच कडवी सुंदर आहेत वर केवळ एक उदारण म्हणून उतरवले आहे.
वैफल्य दुःख वंचना व्यक्त करताना कुठेही कठोर न होता असे शब्द लिहिणे कठीण वाटते. जोडाक्षरेही फार कमी आहेत!
ह्या कवितेचे एखादा गुणी संगीतकार चांगले गाणे करील असे वाटते. तसे झाल्यास कदाचित कडवी निवडावी लागतील किंवा दोन दोन कडवी एका कडव्यासारखी म्हणता येतील (ओळी छोट्या असल्याने)