ज्यांनी पद्धतशीरपणे टंकलेखनाचे सरकारमान्य प्रशिक्षण घेतले आहे त्यांना आज 'युनिकोड' तंत्रामुळे संगणकावर टंकन करण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो.
युनिकोड ही एक १६-बिट वापरून संगणकावर लिपिचिन्हे टंकायची प्रणाली आहे. तिचा माझ्या मते, कळफलकाशी काही संबंध नाही. आपण अभ्यासलेला कुठलाही कळफलक वापरून युनिकोड पद्धतीच्या फॉन्टमध्ये लिखाण करता येते. कुठल्या बटनावर कुठले अक्षर ठेवायचे ते फॉन्ट ठरवतो, युनिकोड नाही. आता पहा, गमभन, मनोगताचे टंक, उपक्रम-मिसळपावचे आणि मराठी विकिपीडियाचे फॉन्ट युनिकोडचे आहेत, पण कळफलक एक नाही. बरहाचा आणि मंगलचा कळफलक एक नाही, सुरेख आणि रघु आणखी वेगळे.
युनिकोडचा मुख्य तोटा असा आहे ती पद्धत संगणकावर इतर ८-बिट पद्धतींच्या दुप्पट जागा व्यापते. पण फायदा असा की, युनिकोड वापरून जगातल्या कुठल्याही लिपीत माहिती शोधता येते. त्यामुळे रोमन लिपीचे महत्त्व कमी झाले आहे.