युनिकोडचा मुख्य तोटा असा आहे ती पद्धत संगणकावर इतर ८-बिट पद्धतींच्या दुप्पट जागा व्यापते.

म्हणजे जी लिपी ८ बिट आणि १६ बिट दोन्हीत लिहिता येत असेल त्या लिपीच्या बाबतीत हे विधान योग्य आहे; पण ज्या लिपी कदाचित तशा लिहिता येणार नाहीत (भाषेत २५६पेक्षा जास्त अक्षरे असल्यास)  त्यांच्या बाबतीत ही तुलना करता येणार नाही असे वाटते.

शिवाय युनिकोड मजकूर पुष्कळ ठिकाणी यूटीएफ८ आराखड्यात परिवर्तित करून साठवला जातो, अशा परिस्थितीत हे प्रमाण काही पूर्वोत्तर युरोपीय भाषांच्या बाबतीत दुप्पट, देवनागरीसारख्या लिपींच्या बाबतीत तिप्पट तर काही पौर्वात्य लिपींच्या बाबतीत चौपट असे येईल असे वाटते.

चू. भू. द्या. घ्या.